36 गुण दर्शन सीतायण
The Divine Journey Of Sita
देवी सीतेची दिव्य यात्रा साधना पथ व दिव्य गुण
- अनेक संघर्ष असूनही जीवनात उच्च निर्णय कसे घ्यावेत?
- कठीण प्रसंगात स्वत:ला सावरुन उत्साही कसे राहावे?
- इतरांच्या भावना समजून घेऊन त्यांना आदर कसा द्यावा?
- स्वत:च्या चुकांमधून काही शिकून त्यात सुधारणा कशी करावी?
- जीवनातील लहान-सहान सुखांच्या क्षणांचे व आनंदाचे मूल्य कसे पारखावे?
- भीतीला सामोरे जाऊन त्यातून बाहेर कसे यावे?
- आपल्या मनात सद्गुण कसे जागृत करावे?
तुमच्या मनात असे प्रश्न असतील तर त्याची उत्तरे मिळवण्यासाठी सीतेच्या जीवनात डोकावून बघा. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत तिने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य केले, हे मोठे आश्चर्य आहे.
‘सिया-राम मय सब जग जानी’ हे रहस्य जग जाहीर आहे. याचा अर्थ असा- संपूर्ण ‘जग सीता-रामाने परीपूर्ण आहे, सर्वांमध्ये ईश्वराचा वास आहे. हे स्पष्ट करण्यासाठी आजपर्यंत जे काही ग्रंथ लिहीले गेले त्यात श्रीरामांचे स्वरुप प्रामुख्याने व्यक्त झाले. मंदिराच्या पायाच्या दगडाप्रमाणे सीता मात्र अव्यक्त राहिली. देवी सीतेच्या अव्यक्त रुपाला चित्रित करून, वाचकांचे जीवन सिया-राममय करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे.
देवी सीतेचे संपूर्ण जीवन श्रीरामांची आराधना व साधना यामध्ये व्यतीत झाले. ज्या दिव्य गुणांच्या आधारे ती प्रत्येक घटनेत, परिस्थितीत साधनेत तल्लीन होऊन, अनुभवरुपी रामाच्या सान्निध्यात राहिली, ते दिव्य गुण या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. याचे वाचन व मनन करून, माणसामध्ये प्राकृतिक रुपात विद्यमान परंतु सुप्त असे सद्गुण अंकुरीत होतील व जे गुण अंकुरीत झाले आहेत त्यांना पालवी फुटेल.
त्यानंतरचे जीवन दिव्य गुणांनी परिपूर्ण असेल. परीणामी श्रीरामरुपी अनुभवाची अभिव्यक्ती होईल. मनुष्यदेह सार्थकी लागेल.



Reviews
There are no reviews yet.