Description
अनेकतेमध्ये आहे एकतेची शक्ती
विचार करा, एका थेंबाने, एका नदीच्या पाण्याने किंवा एकाच पावसामुळे सागर निर्माण होऊ शकेल का? एकाच रंगाने कधी इंद्रधनुष्य बनू शकेल का? एकाच मोत्याची माळ होईल का? एकाच सुराने कधी संगीत निर्माण होईल का?
नाही ना? तुम्ही म्हणाल, ‘असं होणं शक्यच नाही’. मात्र त्या एका सुरात अनेक सूर मिसळले गेले आणि त्यांचा योग्य समन्वय साधला गेला तर अशा सुरांच्या संगमाने एक सुरेल सरगम किंवा संगीत निर्माण होते. त्याचप्रमाणे समूहात कार्य केल्याने संघाच्या शक्तीने त्या संघाच्या एकत्वाच्या जोरावर मोठमोठी आणि अशक्यप्राय वाटणारी कामे अतिशय कमी वेळात यशस्वीपणे पूर्णत्वास जाऊ शकतात.
सदर पुस्तक अगदी हाच उद्देश साध्य करण्यास सक्षम आहे. यात तुम्ही जाणून घ्याल
– संघात किंवा टीममध्ये कोणत्या गुणांचा पाया सर्वांत आधी रचला जायला हवा.
– संघासाठी विश्वासाचे महत्त्व काय आणि ते किती असते?
– संघसदस्य एकत्रितपणे एकच दमदार ध्येय कशा प्रकारे प्रत्यक्षात उतरवू शकतील?
– टीममध्ये संवाद साधताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
– टीमच्या कामामध्ये अडथळा कुठल्या दोषपूर्ण पद्धतींमुळे निर्माण होऊ शकतो?
– या दोषपूर्ण पद्धती कशा दूर कराव्या?
– टीम-लीडरची भूमिका कशी असायला हवी?
मग, आता वाट कसली पाहताय? चला, तुमच्या टीमबरोबर बसून हे पुस्तक वाचायला सुरुवात करा.





Reviews
There are no reviews yet.