
दुःखमुक्तीचे औषध खुशीचा सदरा
एका राज्याचा राजा बऱ्याच दिवसांपासून दुःखी होता. कित्येक इलाज करूनही त्याचं दुःख काही कमी झालं नाही. यावर उपाय म्हणून राज्यातील एका सज्जन गृहस्थाने राजाला ‘खुश माणसाचा सदरा’ परिधान करण्याचा सल्ला दिला. राजाचे शिपाई संपूर्णतः खुश असणाऱ्या माणसाच्या शोधात त्वरित रवाना झाले. त्यांनी खूप शोधाशोध केली. परंतु पूर्णतः खुश असणारा माणूस






