परमेश्वराने आपल्याला दोन कान, एक जीभ आणि त्याच्यामध्ये दिलीय बुद्धी! याचाच अर्थ, प्रथम पूर्ण ऐका, योग्य प्रकारे समजून घ्या आणि मगच बाहेर बोला. परंतु आपण याचा असाच उपयोग करतो का? हो, कदाचित नाही किंवा कधी-कधी.
आपण आपले बॉस, शेजारी, पति-पत्नी, सहकारी किंवा कर्मचार्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं असतं तर त्या सर्वांशी आपलं नातं किती प्रेमपूर्ण, बंधुभावाचं झालं असतं ना? नात्यांविषयींच्या, आयुष्याविषयीच्या अनेक समस्या केवळ योग्य ऐकल्याने संपुष्टात आल्या असत्या.
आपलं मत लोकांसमोर योग्य प्रकारे व्यक्त करणे, हेच कम्युनिकेशन आहे. पण हे अपूर्ण सत्य आहे. पूर्ण कम्युनिकेशनचा अर्थ आहे, ‘योग्य आणि योग्य पद्धतीने बोलणं आणि पूर्ण ऐकणं.’
तात्पर्य, आपल्या मतांचं सादरीकरण योग्यप्रकारे प्रस्तुत करणे, तसंच समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक आणि मनःपूर्वक ऐकणं हादेखील संवाद साधण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. चला, या पुस्तकाद्वारे हे अज्ञात रहस्य जाणून यातून बोध घेऊ या.
ऐकण्याद्वारे नात्यांमध्ये सुधारणा आणि जीवनात विकास कसा कराल?
अर्धवट, वाईट गोष्टीच नव्हे तर पूर्ण कसं ऐकाल?
16 प्रश्नांद्वारे तुमचं निरीक्षण कसं कराल?
एखाद्या राजाप्रमाणे कसं आणि काय ऐकाल?
शब्दांमागे दडलेल्या भावना कशा ऐकाल?
कान दान करण्याचे प्रकार आणि ते दान कसं कराल?
आपलं मन आणि शरीरही काही सांगत असतं, त्यांची भाषा कशी ऐकाल?
ऐकण्याची छत्री योग्य दिशेने कशी उघडी ठेवायची
प्रस्तुत पुस्तकाचा योग्य लाभ घेण्यासाठी, स्वतःमध्ये संपूर्ण ऐकण्याची कला विकसित करा.
Reviews
There are no reviews yet.