Description
मूड डायरेक्टिंग (एम डी) सिद्धांत
* तुमचं मन परिस्थितीनुसार वारंवार अस्थिर होतं का?
* एखाद्या छोट्याशा घटनेमुळे तुमचा संपूर्ण दिवस प्रभावित होतो का?
हे पुस्तक मनातील भावना दाबून ठेवण्याचा सल्ला देत नाही, तर वाईट किंवा चांगला मूड का आणि कसा तयार होतो,
याचा सखोल उलगडा करतं.
हे पुस्तक सांगतं, की ‘मूड बिघडणे’ ही अचानक घडणारी गोष्ट नसून तो एक अनुभव असतो, जो आपली
विचारसरणी, सवयी आणि जागरूकता यांच्याशी निगडित असतो.
’मूड डायरेक्टिंग (एम.डी.) सिद्धांत’ आपल्याला शिकवतो, की जेव्हा आपण आपल्या वाईट मूडशी संघर्ष न करता
त्याला समजून घेण्याचा आणि त्याच्याकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मूडचं व्यवस्थापन
आपोआपच अधिक सहज आणि सोपं होऊ लागतं.
सोप्या उदाहरणांद्वारे, व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि ’नीरज-एम.डी.’ यांच्या रसभरित कथेद्वारे हे पुस्तक
दाखवून देतं की कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता किंवा कृत्रिमपणे मूड सुधारण्याचा प्रयत्न न करता आपण
आपल्या मूडचं प्रभावीपणे व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो. जेव्हा मार्गदर्शन आपल्या मूडद्वारे न मिळता
आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मिळतं, तेव्हा आयुष्य समाधानी आणि हलकंफुलकं बनतं.
हे आपला मूड बदलणारं पुस्तक नाही, तर स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासाचं पुस्तक आहे.




Reviews
There are no reviews yet.