सोडा भीती, चिंता आता- बना निर्भय ‘छोटा नेता’
एखादा मनुष्य आयुष्यात जेव्हा ‘काही वाईटसाईट झालं तर?’ असा विचार सतत करतो, जणू ही वाईट गोष्ट घडलीच आहे, अशी कल्पना करू लागतो, तेव्हा त्याला चिंता वाटू लागते. मग हीच चिंता वाढत जाते, आता ती भीतीचं रूप धारण करते. त्यानंतर चिंता आणि भीती याचं एक चक्र वेगानं फिरू लागतं. आता चिंतेतून भीती निर्माण होते आणि भीतीतून आणखी चिंता! खरंतर भीती आणि चिंता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे लोक आपल्या भीतीवर विजय मिळवू शकत नाहीत, ते आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. जिंकायचं असेल तर भीतीला पराभूत करावं लागेल. त्यासाठी सजगता, साहस आणि विश्वास ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे.
जी मुले भीती किंवा चिंता यांवर मात करू शकत नाहीत, ती आत्मविश्वास गमावून बसतात. मग ती कुठल्याच घटनेकडे योग्य दृष्टिकोनातून बघू शकत नाहीत. यासाठी चिंता नव्हे तर खालील बाबींवर चिंतन करणं अत्यावश्यक आहे
– भीतीमुळे काहीतरी सबब देऊन तुम्ही किती वेळा काम करायचे टाळले आहे?
– भीतीचे शत्रू कोण?
– भीती तुमचा चांगला मित्र, रक्षक बनू शकते ही गोष्ट कधी लक्षात आली आहे का?
– एखाद्या गोष्टीची काळजी करणे आणि चिंता करणे यात फरक काय आहे?
– भीती वाटल्यावर किंवा चिंतेने मन पोखरल्यावर तुम्ही कधी देवाचं स्मरण, कधी प्रार्थना केली आहे का? भयभीत झाल्याने तुमची भीती किंवा चिंता दूर झाली का?
हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल, भीतीशी आपण मैत्री केली. त्यामागची कारणं समजून घेतली तर भीतीचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी करता येतो. चिंता आणि भीती हे दुष्टचक्र भेदता येतं. चिंतेचं योग्य चिंतन करून भीतीशी मैत्री झाल्यावर मग यश मिळायला कितीसा वेळ लागेल? चला तर मग, प्रथम भीतीला मित्र कसं बनवायचं? हे समजून घेऊया.



Reviews
There are no reviews yet.