
‘सातत्य’ हा गुण कसा विकसित कराल?
आरंभशूर लोक कार्याची सुरुवात तर अगदी उत्साहात करतात. परंतु काही दिवसांतच त्यांचा उत्साह कमी होत जातो. परिणामी कार्यात सातत्य राहत नाही. अशावेळी निरंतरता हा गुण कसा अंगीकारावा, हा प्रश्न निर्माण होतो. उत्तरादाखल सर्वप्रथम हे सांगितलं जाईल, ‘निरंतरता ही यशाची गुरुकिल्ली आहे.’ कोणीही एखाद्या कार्याची सुरुवात करतो, तेव्हा त्याला लगेचच यश