Description
राजा हरिश्चंद्र-तारामती : स्वप्न परीक्षा
जीवनाच्या या गूढ प्रवासात असे काही प्रश्न आपल्याला नेहमीच अस्वस्थ करतात-
1. आपल्या वाट्याला येणारे दुःख आणि वेदनाही आपल्याला मिळालेली शिक्षा असते, की आपल्याला
एखाद्या महान सत्याची प्रचिती देण्याचा हेतू त्यामागे असतो?
2. नीती आणि सत्याच्या मार्गावर चालणार्या माणसाचीच परमेश्वर अंतहीन आणि कठोर परीक्षा का
घेतो?
3. असे कोणते परम सत्य आहे, जे मिळाल्यानंतर आयुष्यात दुसरे काहीही मिळवण्याची आवश्यकता
भासत नाही?
या तिन्ही चिरंतन प्रश्नांची उत्तरे शतकानुशतके इतिहासाच्या काही पानांमध्ये दडलेली आहेत, जी
आपण कधी वाचलीच नाहीत; किंवा जरी वाचली असतील, तरी निव्वळ एक ‘करुण कहाणी’ मानून पुढे निघून
गेलो.
हे पुस्तक राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांच्या पौराणिक स्वप्न-परीक्षेच्या कथेला एका वेगळ्या
दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडते जो आपल्याला अंतर्मुख करतो. आयुष्याच्या महाभयंकर अग्निपरीक्षेतून
तावून-सुलाखून निघताना, राजा हरिश्चंद्राने भक्तीच्या चार महान सूत्रांचा अवलंब करून एक आदर्श घालून
दिला. ही सूत्रे आपणही अवलंबल्यास रोजच्या जगण्यातील संघर्षही एका ‘आध्यात्मिक प्रवासात’ रूपांतरित
होऊ शकतो.
ही केवळ राजा हरिश्चंद्र आणि तारा’ती यांची कथा नाही; तर हा आपल्या अंतरंगात दडलेल्या त्या
‘सत्याचा’ शोध आहे, जे सत्य कालातीत आहे, शाश्वत आहे.
सूत्रधार – हे पुस्तक त्या सर्व संवेदनशील वाचकांसाठी आहे, जे जीवनाचे अस्तित्व आणि प्रेम यांचे गहन अर्थ
शोधू इच्छितात… जे प्रापंचिक कर्तव्ये पार पाडतानाही मनात भक्ती आणि मुक्तीची आस बाळगतात… आणि जे
या धावपळीच्या जगात हरवून गेलेली आपली खरी ओळख पुन्हा एकदा प्रेमाने शोधू पाहतात.





Reviews
There are no reviews yet.