Description
7 नियमरूपी औषधाने आनंदी जीवन घडवा
मी असा का आहे… तसा का नाही… समोरचा माणूस असा का आहे… तसा का नाही… तो असा का बोलतो… तो बेफिकीर आहे… त्याला कुणाचीच काळजी नाही. तो फक्त स्वतःलाच योग्य समजतो… माझ्या आयुष्यात असे लोक का आहेत…?
अशा विचारांची शृंखला तुमच्या अंतरंगात सुरू असते का? तुम्ही स्वतः बदलण्याऐवजी समोरच्याला बदलू इच्छिता का? या दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे का?
जर उत्तर ‘हो’ असेल, तर हे समजून घ्या, की या आजाराच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे शोध! ज्यांनी शोध घेतला त्यांनाच उत्तरं सापडली… मग ते शारीरिक आजारांवरचे उपचार असोत किंवा मानसिक समस्यांवरील उपाय…
इथे आपण मनात येणार्या असंख्य विचारांचा शोध घेण्याबाबत बोलत आहोत. असे विचार, जे आपल्यासाठी त्रासदायक ठरतात, आपल्याला दुःखी करतात. यासाठी फक्त एकच सोपा, साधा आणि सरळ उपाय आहे… विषयाच्या मुळापर्यंत जाऊन आपल्या अंतरंगाचा शोध घेणे.
तुम्ही जर तुमचे विचार, धारणा आणि समजुतींच्या पलीकडे जाऊन आनंदी राहू इच्छित असाल, तर हे पुस्तक निश्चितच तुमचं मानसिक आयुष्य समृद्ध करणारं एक रामबाण औषध ठरेल.





Reviews
There are no reviews yet.