
इच्छांच्या भोवर्यापासून कसं वाचाल
इच्छा… कामना… आकांक्षा… यांना कोणतंही नाव द्या; सर्वांचा अर्थ एकच आहे. मनुष्याचं मन क्षणोक्षणी इच्छांनी भरलेलं असतं. एक इच्छा पूर्ण होते न होते, तोवर दुसरी इच्छा जागृत होते. मग तिसरी… चौथी… आणि हे चक्र अव्याहतपणे अगदी जीवनाच्या अंतापर्यंत सुरूच राहतं. इतकंच नव्हे, तर मृत्यू दारात उभा असतानाही मनुष्याच्या मनात एखादी
