राजयोग गीता असामान्य समर्पण युक्ती गूढ ज्ञानरूपी उपहार
अनादी काळापासून मनुष्य जगाची उत्पत्ती आणि प्रलय यांचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करतोय. ही सृष्टी कशा प्रकारे कार्यरत आहे, जिवांच्या जन्म-मरणाचं रहस्य काय आहे, या बाबी जाणण्याची त्याला उत्कंठा आहे. त्यासाठी तो जप, अप, शोध, ध्यान, मनन, चिंतन हे सर्व मार्ग चोखाळतो. अशा सत्यजिज्ञासुंसाठी हे पुस्तक म्हणजे परम गोपनीय ज्ञानरूपी बहुमोल उपहारच आहे. या पुस्तकात आपण खालील महत्त्वपूर्ण बाबी जाणाल :
* पुनःपुन्हा उत्पत्ती आणि नाश यांचं चक्र कोणत्या आधारावर निश्चित होतं?
* या संपूर्ण सृष्टीचं स्वचलित नियमांद्वारे नियमन करणारा असा कोणता सिद्धान्त आहे?
* पापी आणि दुर्वर्तनी मनुष्याला मुक्ती मिळू शकते का?
* दैवी आणि असुरी प्रकृती कोणत्या आहेत?
* सकाम आणि निष्काम उपासना कशी असते?
* जगदीशात जग सामावलेलं आहे, की जगात जगदीश?
* चला तर या पुस्तकात दिलेलं परम गोपनीय ज्ञान उलगडून सृष्टिरहस्याचा बोध ग्रहण करू या.
Reviews
There are no reviews yet.