मनाला वश करण्यासाठी संयम गीता – कर्मसंन्यास योग भोग आणि दमन या दोहोंमध्ये मध्यम मार्ग स्वीकारा आत्मसंयमाद्वारे परिपूर्ण योगी बना जो कर्मरत आहे, तो संन्यासी नाही जो संन्यासी आहे, तो कर्मरत नाही ॥
‘कर्म’ आणि ‘संन्यास’ हे दोन भिन्न मार्ग आहेत, असं जे समजतात, त्यांचं मत खरंतर उपरोक्त पंक्तींसारखंच असतं. लोक आपल्या प्रापंचिक जबाबदार्यांपासून पलायन करून, आपण कर्मत्याग केलाय असा विचार करतात. परंतु भगवान श्रीकृष्ण अशा लोकांचा गैरसमज दूर करून पाचव्या अध्यायात सांगतात, वास्तविक कर्मयोग आणि संन्यासयोग हे विभिन्न मार्ग नसून ते परस्परपूरक असेच आहेत. कर्म आणि संन्यास यांचं ज्या बिंदूवर मिलन होऊन कर्मसंन्यासयोग घडतो, त्यावर स्थापित झालेला मनुष्यच पूर्ण योगी ठरतो.
आत्मसंयम म्हणजे, स्वतःवर संयम, मनावर नियंत्रण. जे बेहोशी वा कठोरतेने नव्हे, तर प्रगल्भ समज, पूर्ण सजगता आणि प्रामाणिकपणे केलं जातं. बेलगाम भोगलालसा आणि सर्वसंगपरित्याग यांदरम्यानचा हा मार्ग असून, प्रापंचिक आणि आध्यात्मिक प्रवासात संयमाचं अतिशय महत्त्व आहे. याद्वारे केवळ शरीरावरच नव्हे; तर मन, बुद्धी, भावना या सर्वांवरच नियंत्रण मिळवता येतं, ईश्वराशी योग साधता येतो. इतकंच काय; पण इहलोकी सर्वोच्च अभिव्यक्ती साकारता येते ते वेगळंच! मात्र हे कसं शक्य होतं? याचं रहस्य प्रस्तुत पुस्तक उलगडतं.
चला तर मग, आपणही आता या पुस्तकात दिशादर्शन केल्याप्रमाणे पूर्ण योगी बनण्याचा प्रयत्न करूया. कर्मसंन्यासयोग, आत्मसंयमयोगाद्वारे कर्मवीर बनून सर्वोच्च पृथ्वीलक्ष्य साकारूया. यात आपण जाणणार आहोत,
* कर्म आणि संन्यास एक कसं असू शकतात?
* योगी किती प्रकारचे असतात?
* पूर्णयोगी म्हणजे काय?
* आत्मसंयमाचं महत्त्व काय?
* इंद्रियावर आणि चंचल मनावर नियंत्रण कसं ठेवावं?
Reviews
There are no reviews yet.