इंद्रियांवर विजय कधी, का आणि कसा प्राप्त कराल
इंद्रियांवर यशस्वी होण्याचा अंतर्गत मार्ग
कासव असा एक प्राणी आहे, ज्याच्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण गुण आहे. एखाद्या समुद्री प्राण्यापासून किंवा कोणत्याही अन्य जीवापासून धोका आहे, हे लक्षात येताच तो लगेच आपले पाय आक्रसून घेऊन त्वरित कवचाखाली लपतो.
कासवाचा हाच गुण आत्मसात करून मोहमायेत गुंतलेल्या इंद्रियांना त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याची, शुद्ध होण्याची कला शिकायची आहे. कासवाच्या पायाप्रमाणेच मनुष्यालाही पंचेंद्रिये लाभली आहेत. ती प्रत्येक वेळी मायेच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना प्रशिक्षित करायचं आहे, ज्यामुळे जेव्हा आपलं मन मायेत अडकेल, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवेल, तेव्हा ते तत्क्षणी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवूून स्वतःचं रक्षण करू शकेल.
इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित कसं करायचं आहे, हे समजण्यासाठी या पुस्तकाचा प्रत्येक खंड सखोलपणे अभ्यासून आत्मसात करा. त्यासाठी पुढील गोष्टी समजून घेऊ या:
मनावर बुद्धीचा अंकुश मंत्र काय आहे
ऐंद्रिक अभ्यासाचा मार्ग कोणता
इंद्रियांचा उपवास कसा करावा
‘नो न्यू न्यूज’ असं इंद्रियांना केव्हा म्हणावं
शरीर आणि इंद्रियं दुर्बलता न ठरता शक्ती कसे ठरतील
इंद्रियांना आपला मित्र बनवण्याचं रहस्य काय
पंचेंद्रिये यशाच्या पायर्या कसे ठरतील
इंद्रियांवर ताबा ठेवून अंतर्यामी कसं वळवाल
इंद्रियांचा सर्वोत्तम उपयोग कसा कराल
Reviews
There are no reviews yet.