ज्ञान विज्ञान अक्षर गीता अज्ञानमुक्तीसाठी सद्गती युक्ती
ज्ञानाकडून सद्गतीकडे…
बेसावधपणा, लाचारी, अज्ञान आणि दुःख यांनी भरलेलं जीवन जगत असताना मनुष्य एका अशा अवस्थेची कामना करू लागतो, जिथे त्याला या सर्व दुःखदायी बाबींपासून कायमस्वरूपी मुक्ती, सद्गती मिळवायची असते. अशी सद्गती प्राप्त करून त्याला आनंद, शांती आणि संतुष्टीरूपी सागरात निश्चिंतपणे डुंबत राहायचं असतं.
गीतेमध्ये श्रीकृष्ण ठामपणे सांगतात, ‘होय! अशी सद्गती प्राप्त करणं निश्चितच शक्य आहे आणि ती ही केवळ वास्तव ज्ञानाद्वारे!’ गीतेच्या सातव्या, आणि आठव्या अध्यायांवर आधारित हे पुस्तक ज्ञान आणि सद्गती यांचं मर्म सविस्तर समजावून सांगतं.
प्रस्तुत पुस्तकात आपण पुढील गोष्टी जाणू शकाल –
* आध्यात्मिक भाषेत ज्ञान आणि विज्ञान यात फरक काय असतो?
* वास्तव ज्ञानाचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे?
* भक्त किती प्रकारचे असतात?
* ईश्वराला कोणते भक्त सर्वाधिक प्रिय असतात, असा भक्त कसं बनावं?
* सृष्टीच्या निर्मितीची आणि लयाची प्रक्रिया म्हणजे काय? सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मा कोणाला म्हटलं गेलंय?
* ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत आणि अधिदेव काय आहेत?
* जीवनाच्या दृष्टिकोनातून जन्म-मरण, आवागमन, पुनरावृत्ती, सद्गती… या शब्दांचा वास्तविक अर्थ काय?
* देहत्यागण्याच्या वेळी मनुष्याकडे कोणतं ज्ञान असायला हवं, जेणेकरून त्याला सद्गती प्राप्त होईल?
चला तर या पुस्तकात दिलेलं परमगोपनीय ज्ञान, आत्मसात करून सृष्टिरहस्याचा बोध ग्रहण करू या, सद्गतीच्या मार्गावर अग्रेसर होऊ या…
Reviews
There are no reviews yet.