तीन संन्यासी
(भगवान, संत आणि स्वामी)
ज्ञान, विवेक व बुद्धी यांचा संगम
तीन संन्याशांचे जीवनचरित्र
भगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर व स्वामी विवेकानंद यांना कोण ओळखत नाही? या महापुरुषांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार केले गेले, कित्येक पुस्तकेही लिहिली गेली. ‘तीन संन्यासी’ या पुस्तकातसुद्धा या तिघांचे जीवनचरित्र एकत्रितपणे गुंफण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर संन्यस्त जीवनावरही प्रकाश टाकला आहे.
संन्यास म्हणजे सांसारिक सुख-सुविधांचा त्याग करून, हिमालयात जाऊन एकांतवासात राहणे, असे मानले जात होते. परंतु, या तीन संन्याशांनी संन्यासाची ही परिभाषाच बदलून टाकली. त्यांनी लोकांसमवेत राहून त्यांना उच्चतम मार्गदर्शन केले. निःस्वार्थ जीवनाची दिशा दाखवली.
या तीन संन्याशांनी आपल्या जीवनाच्या कालखंडात लोकांना अमूल्य अशी शिकवण
दिली. जनमानसांत खोलवर रुजलेल्या धारणांपासून लोकांना मुक्त करून जीवनाचे खरे उद्दिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा दिली. संन्यास घेण्यासाठी लोकजीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; तर इथे राहूनच संन्यस्त जीवन जगता येते, हा महत्त्वपूर्ण बोध या पुस्तकाद्वारे प्राप्त होतो.
आध्यात्मिक मार्गावरून चालणार्या प्रत्येक सत्यसाधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत आहे. सत्यप्राप्तीसाठी तुम्हाला संन्यास घ्यावासा वाटत असेल, तर हिमालयात जाऊन एकांतवासात राहण्याची आवश्यकता नाही. केवळ असे पुस्तक लाभणे पुरेसे आहे. हे तीन संन्यासी तुम्हांला योग्य मार्गदर्शन करतील व लोकांसमवेत राहून संन्यासी जीवन जगण्याची कला शिकवतील.
Reviews
There are no reviews yet.