द ब्लाइंड टॉर्च – कृष्णलीलेचे साक्षी
संत सूरदास हे केवळ एका कवीचं नाव नाही तर ते आहे, जगातील एका महान आश्चर्याचं! ज्याने हे सिद्ध केलं आहे, अनन्य भक्ती एखाद्या व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते, की जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचं सुंदर वर्णन करू शकते. जसं सूरदासांनी कृष्णलीलांचं केलं आहे. ज्ञान आणि भक्तीने मनुष्याच्या अंतर्मनाची दृष्टी स्पष्ट कशी होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजतं. सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेलं कठीण ज्ञान आणि भक्तीचं वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केलं आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामामध्ये रंगूनच गेलेत. श्रीकृष्ण आपली साहसी कार्य आणि गीताज्ञान यांद्वारे भक्तांसमोर जे विराट रूप धारण करत असत, तेच सूरदासांच्या पदांमुळे बाळकृष्णाच्या रूपात भक्तांच्या मनात खोलवर ठसतं.
प्रस्तुत पुस्तकात आपण जाणून घेणार आहोत—
• सत्त्वगुणी अहंकाराचा परिणाम काय होतो…
• ईश्वरावर कोणत्या सीमेपर्यंत विश्वास ठेवावा…
• मायेला पारखण्याची कला कशी शिकाल ?
• राम आणि श्याम, यांमध्ये महान कोण ?
• मानसिक दर्शन कसं कराल ? – The Blind Torch
• जीवनात डब्ल्यू एच (WH) प्रश्नांचं महत्त्व काय आहे?
• संपूर्ण समर्पण कसं करावं?
चला, आपणही सूरदासांचं पावन चरित्र वाचून, त्यांच्या गुणांचं आपल्या जीवनात अनुसरण करू या. ज्याद्वारे सूरदासांनी कृष्णलीलेचं दर्शन आपल्याला सुसह्य केलं, त्या दृष्टीचा लाभ घेऊ या.



Reviews
There are no reviews yet.