वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर म्हणजे साहसाचे, परमोच्च भक्तीचे आणि समर्पणाचे उदाहरण. विश्वातील प्रत्येक प्राणिमात्रांत, सजीव-निर्जीव गोष्टींत केवळ परमेश्वरच पाहा, ही संत ज्ञानेश्वरांनी दिलेली मुख्य शिकवण आहे. आपल्या शक्तींचा, सिद्धींचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी न करता, इतरांच्या कल्याणासाठी करायला हवा; आपला द्वेष करणाऱ्यांनाही उदार अन्तःकरणाने क्षमा करून त्यांना भक्तियुक्त प्रतिसाद द्यायला हवा; हा संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा मुख्य संदेश आहे. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ग्रंथांत, अभंगांत आणि पसायदानात अंतिम सत्याचा शोध घेणाऱ्या साधकाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे गवसतात.
संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र, त्यांच्या रचना, त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवन कार्याची प्रस्तुतता आणि अंतिम सत्याचा शोध यांमधील अनुबंध सरश्री आपल्या प्रवचनांतून उलगडून दाखवतात. सरश्रींच्या सहज, सुलभ आणि रसाळ वाणीतून साकारलेल्या प्रस्तुत ग्रंथ भक्तीची सर्वोच्च अवस्था जाणू इच्छिणाऱ्या प्रत्येक मनुष्याने आवर्जून वाचायला हवा.
Reviews
There are no reviews yet.