निष्काम सेवकाचं निःस्वार्थ जीवन
स्वार्थ, कपट, कंजूषी, क्रोध, लोभ यांसारख्या विकारांनी भरलेल्या धावपळीच्या युगात जेव्हा कोणी आपलं संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठीच व्यतीत करू लागतं, तेव्हा लोक त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. परंतु मदर टेरेसा यांचं जीवनचरित्र म्हणजे जणू काही सर्व सद्गुणांचा आरसाच… ज्याची सर्वसामान्य मनुष्य कधी कल्पनाही करू शकत नाही… ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वैयक्तिक इच्छा-आकांक्षांचा त्याग केला… एखाद्या निष्काम सेवकासारखं पीडितांच्या सेवाकार्यात व्यतीत केलं… त्यांच्यातील हेच भाव आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा एक प्रामाणिक, प्रेरक प्रयत्न… म्हणजेच हे पुस्तक! यात वाचा-
* मदर यांचं सेवाकार्याविषयीच आवश्यक असं प्रशिक्षण
* त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभ
* मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची स्थापना आणि तिचा विकास
* अनेक अडचणीनंतरही त्या आपल्या कार्याबाबत ठाम कशा राहिल्या
* अन्य सेवकांची मानसिक गुणवत्ता कशी वाढवली
* सेवाकार्याबाबत क्षमा आणि कृतज्ञता यांचं महत्त्व
* सेवाकार्याच्या मार्गावरून वाटचाल करताना आपल्या दुर्बलतेवर मात कशी केली?
समर्पित आणि विनाअट जीवन जगणार्यांसाठी प्रस्तुत पुस्तक म्हणजे जणू एक मार्गदर्शकच! द्विधावस्था, आपत्तीवर मात करण्याचं दुर्दम्य साहस आणि निःस्वार्थपूर्ण जीवन जगून संपूर्ण आयुष्य सेवाकार्यात कसं घालवता येऊ शकतं, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मदर टेरेसा! चला तर मग, प्रामाणिक, अव्यक्तिगत आयुष्य जगण्यासाठी, निःस्वार्थ सेवक बनण्यासाठी या पुस्तकाचं वाचन-मनन करूया, मदर टेरेसा यांच्या चरित्रातून नवी प्रेरणा घेऊया…
Reviews
There are no reviews yet.