आनंदरूपी आकाशात भरारी
जर माझ्या जीवनात असं घडलं असतं… जर माझ्या मनाप्रमाणे सर्व घटना घडल्या असत्या… जर माझं व्यक्तिमत्त्व अतिशय भारदस्त आणि रुबाबदार असतं, तर इतरांवर माझी छाप पडली असती… जर पाऊस वेळेवर पडला असता, तर इतकी महागाई वाढली नसती… अशाप्रकारे मनुष्याचं जीवन प्रत्येक क्षणी जर-तरच्या अंतहीन शृंखलेनं व्यापलेलं असतं.
कारण जर-तर ही अशी मृग तृष्णा आहे, ज्यामुळे मनुष्याचं जीवन अतृप्त, निरर्थक इच्छारूपी वाळवंटात भरकटतं. मनुष्य दु:ख आणि निराशेनं हताश होतो. जोवर माणूस आपलं आयुष्य आहे तसं स्वीकारत नाही, तोवर या जर-तरच्या डुबणाऱ्या नावेतच स्वार असतो, जणू तो स्वत:ला दु:खरूपी दरीतच ढकलत असतो.
प्रस्तुत पुस्तक आपल्याला या सर्व गोष्टींतून मुक्त करून आनंदरूपी आकाशात भरारी मारण्यासाठी साहाय्यक ठरेल. या आनंदमयी यात्रेत आपलं संपूर्ण जीवन सुंदर तर होईलच. शिवाय आपल्यासमोर जीवनाची अनेक महान रहस्यंही उलगडतील.
Reviews
There are no reviews yet.