अहंकारातून स्वानुभवाकडे
‘मोडेन पण वाकणार नाही’ या विचारधारेत वाहवत जाणार्यांचं अधःपतन निश्चित असतं. असे लोक अज्ञान आणि बेहोशीमुळे मोहात अडकून पृथ्वीलक्ष्यापासून विचलीत होतात. अशी चूक आपल्याकडून कदापि होऊ नये यासाठी ‘अहंकारातून स्वानुभवाकडे’ वाटचाल करूया. अहंकार मूळापासून नष्ट करूया.
अहंकार, अभिमान, स्वाभिमान आणि स्वभान… वरकरणी पाहता एकसारखे वाटणारे हे शब्द. पण या सार्या शब्दांचा आशय मात्र वेगवेगळा आहे. ‘अहंकार’ हा नकारात्मक शब्द आहे, पण ‘स्वाभिमान’ हा सकारात्मक शब्द असून स्वानुभव, स्वभानाकडे घेऊन जाणारा आहे.
अहंकारातून मुक्त झाल्यावरच नम्रतेची महान शक्ती प्राप्त होते. आत्मनियंत्रण आणि समज यांच्या संयोगातून निर्माण झालेली ‘नम्रता’ ही फार मोठी शक्ती आहे. पण अज्ञान व आसक्तीतून आलेली नम्रता कमकुवतपणाची निदर्शक आहे. प्रस्तुत पुस्तकाचा लाभ घेऊन तुम्ही नम्रतेशी मैत्री करू शकाल आणि अहंकारातून मुक्त व्हाल.
चला तर मग, अहंकारातून ‘स्व’भानाकडे आणि स्वभानातून स्वानुभवाकडे मार्गक्रमण करूया…
Reviews
There are no reviews yet.