ज्ञानगंगेचे भगीरथ
संत रविदास
बोध, भक्ती, नीतीचे सद्गुरू
मन चंगा (शुद्ध) तर प्रत्येक जल गंगा
“बाहेर गंगा पाहिजे असेल तर आधी स्वतःचे मन स्वच्छ करा, स्थिर करा. शरीरातील मन शुद्ध असेल तर घरातील नळातही गंगा आहे. तुमची जात, कुळ घराणे, पद जे काही असो; तुमचे मन निर्मळ, करुणामय व भक्तिमय असेल तर मुक्ती प्राप्त करण्यासाठी गंगा स्नान करण्याची गरज नाही.” ही शिकवण आहे ज्ञानगंगेचे भागीरथ संत रविदास यांची!
याखेरीज त्यांचे इतर काही महत्त्वपूर्ण उद्देश याप्रमाणे-
* जन्माने कोणी श्रेष्ठ ठरत नाही, ना निम्न सिद्ध होतो. कर्मामुळे माणूस नीच ठरू शकतो व कर्मामुळेच तो प्रत्येक युद्ध जिंकू शकतो.
* कर्मंच मुक्त करू शकतात व बंधनातही टाकू शकतात, म्हणून नेहमी चांगले कर्म करा, सतत कार्यरत रहा.
* भक्ती करण्यासाठी म्हातारपण येण्याची वाट पाहू नका. तुमचे वय कितीही असो, भक्तीची सुरुवात करा.
* हाताने काम, मुखाने रामनाम, हृदयात राम ठेवून खरे कर्मयोगी व्हा.
* सामाजिक व धार्मिक निंदेपुढे वाकू नका. सत्याच्या सामर्थ्याच्या बळावर ताठपणे उभे राहा.
संतांची प्रत्येक लीला माणसाला काही ना काही शिकवण्यासाठी असते. प्रस्तुत पुस्तकात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना, त्यामागे दडलेल्या शिकवणुकीसहीत संकलित केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रसिद्ध रचना अर्थासहीत समजावून सांगितल्या आहेत; जेणेकरून वाचक त्यातील संकेत समजू शकतील. संत रविदास वाचकांसाठी ही ठेव ठेवून गेले आहेत.
Reviews
There are no reviews yet.