आपल्या जीवनाचा अर्थ न कळल्यामुळे माणसाचं संपूर्ण आयुष्यच संभ्रमात निघून जातं. कधी तो दोरीलाच साप समजून झोडपत राहतो तर कधी फासाला झोका समजून लटकू पाहतो. या सगळ्या गोंधळात अर्थ कळण्याची शक्यता दुरावत जाते. आयुष्यातला आनंद हरवून जातो. हा हरवलेला आनंद पुन्हा प्राप्त करायचा असेल तर आधी दु:ख म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. दु:खाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन प्राप्त झाला तरच हे घडू शकतं. त्यानंतरच आपण नेहमी आनंदी राहण्याचा दृढ संकल्प करु शकतो आणि लक्षात येतं की ज्याला आपण दु:ख समजत होतो ती तर होती एक संधी !
मग दु:खच उरत नाही आणि सुरु होते ती शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल.
„संवाद गीता’ वाचायला सुरुवात करणं म्हणजे सरश्रींचं बोट धरुन त्या अनंदमार्गावर टाकलेलं पहिलं पाऊल होय. या गीतेचा प्रत्येक अध्याय पुन:पुन्हा वाचा. त्यातील प्रत्येक शब्द तुमच्या विचारांमध्ये सामावून घ्या आणि मग बघा खुशी आपल्याकडे कशी चालत येते !
Reviews
There are no reviews yet.