स्पिरिच्युअल पेरेंटिंग
सुजाण आणि आध्यात्मिक पालकत्व
या फुलपाखरांचे नाजूक पंख जपा
प्रत्येकजण बालपणी स्वप्नं बघतो. आपणही बघितली आणि आपली मुलंही बघत असतील. स्वप्नांच्या या रंगीबेरंगी फुलपाखरांचे पंख खूप नाजूक असतात. मुलांच्या इवल्या इवल्या डोळ्यांतली ती चमक, त्यातलं कुतूहल आणि त्यांच्या स्वप्नांचे नाजूक पंख आईवडिलांनी जपायला हवेत. हे पंख तुटणार नाहीत, मुलांच्या नाजूक स्वप्नांचा चुराडा होणार नाही, त्यांच्या चमचमत्या जगात अंधार पसरणार नाही, यासाठी त्यांच्या पालकांनीच काळजी घ्यायला हवी. काही वेळा पालकांच्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे ही देवाघरची फुलं अकाली कोमेजतात. त्यांना हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, त्यांच्या स्वप्नांच्या फुलपाखरांना मुक्त भरारी घेऊ द्या, रंगीबेरंगी फुलांवरचा मध चाखू द्या. त्यांचे पाय बंधू नका, त्यांचे पंख कातरू नका…नाहीतर कदाचित तुमच्याच स्वप्नांचा चुराडा होईल.
आपली मुलं म्हणजे नाजूक फुलपाखरं आहेत. कर्कश आवाजाने घाबरतील, त्यांचा प्रेमाने सांभाळ करा.
माता-पित्यांचीही मुलांच्या बाबतीत काही स्वप्नं असतात, काही आशा-आकांक्षा असतात. मात्र काही वेळा पालकांच्या सुप्त आणि अपुर्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून केली जाते. याचाच ताण येऊन मुलं अकाली कोमेजून जातात. म्हणूनच प्रथम मुलांना समजून घ्या. सुजाण पालक बना, स्वतःचा आध्यात्मिक पाया भक्कम करा आणि मग मुलांना समजवा. तुम्ही त्यांना समजून घेतलंत तर तीही तुमचं म्हणणं नक्की समजून घेतील, याची खात्री बाळगा. याव्यतिरिक्त या पुस्तकात वाचा –
– मुलांवर सुसंस्कार कसे करावे?
– मुलांना हसत-खेळत प्रशिक्षण कसे द्यावे?
– मुलांमध्ये कोणते बीज रुजवावे?
– मुलांची सतत काळजी न करता त्यांच्यापर्यंत सकारात्मक तरंग कसे पोहोचवावेत?
– मुलांना योग्य मार्गदर्शन कसे करावे?
– मुलांना महत्त्वाचे निर्णय घ्यायला कसे शिकवावे?
पालकत्व ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती एकदाच करून उरकायची नसते, तर प्रयत्नपूर्वक आणि धीराने, प्रेमाने साधायची असते. चला तर मग, सुजाण पालकत्वाच्या या सुंदर आणि समाधान देणार्या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा.



Reviews
There are no reviews yet.