महान भक्त
शबरी
प्रतीक्षा परीक्षा समीक्षा संगम
मायेच्या अंधःकारात भक्तीची ज्वाळा
आजमितीला ईश्वरप्रेमींच्या समोर सर्वांत मोठी अडचण अशी आहे, की इतकी सारी प्रापंचिक सुख-साधने, आकर्षण असताना व असत्याने भरलेेल्या वातावरणात राहून भक्ती कशी करावी? ही कला शिकायची असेल तर शबरीपेक्षा चांगले उदाहरण कोणते असू शकेल? शबरीने तामसी व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्तीच्या शीतल अग्नीची निवड केली, श्रीरामांची भक्ती केली.
शबरीने ते वातावरण, ती संगत सोडून दिली. कारण अशा ठिकाणी राहून भक्ती करण्यात अडचण येत होती. तिने भक्ती करणे सोडले नाही. या ग्रंथात महान रामभक्त शबरीचे भक्तीमय वर्णन केले आहे. ते वाचून, त्यावर मनन करून आपण शिकू शकतो –
* शबरीला लेडी बुद्ध का म्हणायचे?
* शबरीचा अज्ञातवास कोणत्या भक्तीभावनेत व कसा व्यतीत झाला?
* सेवेची खोली मोजायची असेल तर शबरीच्या जीवनावरून कसे शिकावे?
* शबरीच्या उष्टया बोरांचे आंतरीक रहस्य कोणते?
* शबरीच्या भूतकाळाचा वर्तमान व भविष्याशी काय संबंध आहे?
* शबरीची ग्रहणशीलता, गुरुभक्ती, प्रेम व समर्पण कसे होते?
* शबरीसारखे जीवन जगणे आजच्या घडीला शक्य आहे का?
या ग्रंथाद्वारे शबरीच्या महान चरित्रावर मनन करत या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सहज उतरतील. त्यामुळे विपरीत व प्रतिकूल वातावरणात राहूनही भक्ती सर्वोच्च स्तरावर पोहोचेल. परिणामस्वरूप रामरूपी ईश्वराचे मिलन घडेल.



Reviews
There are no reviews yet.