मृत्यू उपरांत जीवन
महाजीवनाचा आरंभ
मृत्यूला जर जाणायचे असेल, तर मृत्यूइतका उत्तम शिक्षक नाही… जगात खूप कमी लोक मृत्यूविषयी जाणू इच्छितात… व्यक्तीतील अहंकार आणि मृत्यूविषयीचे अज्ञानच मृत्यूचे भय निर्माण करते…
पृथ्वीवर मानवीशरीरात एक अपूर्व तयारी चालू आहे… मृत्यूनंतरही जीवन असते, हे सत्य जाणून घेणारा आयुष्याचा एकही क्षण वाया जाऊ देत नाही… प्रत्येक घटनेतून योग्य बोध घेऊन तो आपले धैर्य वाढवण्याचा निर्धार करेल… संपूर्ण विश्वासाठी निमित्त ठरेल…खरंतर मृत्यूविषयी लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज निर्माण झालेले असतात. सर्वांनी मृत्यूचे रहस्य जाणावे आणि निर्भय होऊन जीवन जगावे, हा संदेश या पुस्तकाद्वारे मिळतो. खरंतर मृत्यू म्हणजे अंत नसून तो तर महाजीवनाचा आरंभबिंदू आहे. पण याविषयी जाणून घेण्यासाठी गरज असते, सर्वसमावेशक दृष्टिकोनाची. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला हाच दृष्टिकोन प्रदान करेल. कारण हे केवळ पुस्तक नसून हा आहे सरश्रींच्या प्रवचनांच्या मालिकातून आविष्कृत झालेला दीपस्तंभ.
Reviews
There are no reviews yet.