मोह – विनाश पथ
आनंदप्राप्तीसाठी आपण कुणाचे गुलाम तर नाही ना? आनंद आपल्या जवळच तर नाही ना?
असली आनंद तर आपल्या अंतर्यामीच आहे. त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु मनुष्य यापासून अनभिज्ञ असल्यामुळे तो आनंदाचा शोध बाहेर घेऊन एखाद्याचा गुलाम बनतो, लाचारी पत्करतो. कमीत कमी सुखसोयी असतानाही आनंदी राहाणं, हाच खरा विकास आहे. जो माणूस आपलं शरीर आणि मन अनुशासित करतो, तो मोहांपासून मुक्त असं मोह्तेज जीवन जगतो. मोह्तेज म्हणजेच मोह आणि तिरस्कार यांच्यापलीकडील जीवन. मनुष्य जेव्हा मोहाची मर्यादा ओलांडतो, तेव्हा त्याच्या मोह्तेज जीवनाची सुरुवात होते.
मोहापासून मुक्ती मिळवणं म्हणजेच मोहाचा त्याग करणं होय. परंतु तुमच्याकडून मोहाचा त्याग तेव्हाच होईल, जेव्हा ‘मोह मोती नसून मोती आहे’ याचं तुम्हाला ज्ञान होईल. मोहाला मातीमोल किंमत ध्यायला शिकाल, तेव्हा मोहजालातून मुक्त होणं सहज शक्य होईल. म्हणून प्रत्येकानं मोहाचं नव्हे, तर तेजाचं पारखी बनायला हवं.
Reviews
There are no reviews yet.