साद देती यशशिखरे
पृथ्वीवरील मनुष्याच्या अस्तित्वाचं मुलभूत कारण म्हणजे स्वतःला जाणणं, स्वानुभव प्राप्त करणं. खरंतर हा अनुभव शब्दातीत असून, त्याला ना कोणता बाह्य आकार देता येतो, ना कोणतं शब्दरूप! पण तो प्राप्त करण्याची प्रेरणा मात्र निश्चितच जागृत करता येते. वाचकांना या सर्वोच्च आनंदाची, स्वानुभवाची झलक मिळावी, हाच प्रस्तुत पुस्तकाचा मूळ उद्देश! याच कारणास्तव प्रस्तुत पुस्तकात महापुरुषांच्या जीवनातील उद्बोधक कथांवर प्रकाश टाकण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून १२ शक्तींचा आविष्कारही शब्दबद्ध करण्यात आलाय. शिवाय महापुरुषांच्या असामान्य कार्याचा वेधही घेण्यात आलाय.
महापुरुषांचं जीवनकार्य म्हणजे प्रत्येक मनुष्याला साद घालणारं यशाचं शिखर. या यशोशिखरावर आरूढ होण्यासाठी गरज आहे, अंतःप्रेरणा जागृत करण्याची, महापुरुषांच्या जीवनाचा मागोवा घेण्याची आणि हा मागोवा घेताना प्राप्त होणारा बोध जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणण्याची. तुम्ही यशोशिखरावर विराजमान होण्यासाठी तयार असाल, तर या मार्गातील संभाव्य अडथळे पार करण्यासाठी महापुरुषांची जीवनगाथा तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल. मग तुमचं जीवनही महाजीवन बनेल.
Reviews
There are no reviews yet.