इच्छाशक्ती विल पावरचा चमत्कार आपल्यातील इच्छाशक्ती कशी जागृत कराल
- वर्षारंभी केलेला संकल्प पूर्णत्वास जायलाच हवा, असं आपल्याला वाटतं का?
- सकाळी लवकर उठून आपण व्यायाम करू इच्छिता का?
- चुकीच्या सवयींतून मुक्त होऊन, निरामय आयुष्य जगण्याची इच्छा आपल्याला आहे का?
- आपल्या रागावर नियंत्रण मिळवू इच्छिता का?
- क्षणभंगुर मोहाला बळी पडून अनावश्यक गोष्टी विकत घेण्याची इच्छा टाळता येईल का?
या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ अशी असतील, तर या पुस्तकाचा लाभ घेऊन आपल्यातील इच्छाशक्ती बळकट करा. मनुष्यातील इच्छाशक्ती जर उत्तुंग असेल, तर त्याला कोणता तरी मार्ग सापडतोच. अन्यथा, केवळ सबबी सांगून मनुष्य आपली इच्छाशक्ती अधिकाधिक कमकुवत करतो.
आपल्या स्वाथ्याची काळजी घ्यायलाच हवी, हे ठाऊक असूनही मनुष्य कित्येकदा असे पदार्थ भक्षण करतो, जे त्याच्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. तरी यावर तो सबबी सांगतो, ‘त्या व्यक्तीचा आग्रह असल्याने तो नाकारता आला नाही…’ अथवा ‘अन्नाचा अपमान व्हायला नको, ताटात आलेले पदार्थ टाकून कसे द्यायचे, म्हणून ते जबरदस्ती खावे लागले…’ अशा स्थितीत ‘आपण विनाकारण सबबी देत आहोत, की आपल्यातील इच्छाशक्तीच कमकुवत झाली आहे,’ हे आधी बघायला हवं.
चला तर मग, या पुस्तकाद्वारे आपल्यातील इच्छाशक्ती बळकट बनविण्याचे काही सहजसुलभ उपाय आपण जाणून घेणार आहोत. कारण इच्छाशक्ती हे एक असं साधन आहे, ज्याद्वारे आपल्या आयुष्यातील आश्चर्यकारक बदल आपण पाहू शकणार आहोत.
Reviews
There are no reviews yet.