मन आणि बुद्धीपलीकडची परमबोध यात्रा
राजपुत्र सिद्धार्थाला जीवनात असे काही संकेत मिळाले, ज्यायोगे ते सत्यसाधक बनले. राज्य, ऐश्वर्य, प्रिय व्यक्ती यांचा त्याग करून ते दुःखमुक्तीच्या शोधात निघाले. या मार्गावर त्यांनी आपल्या शरीराला अतिशय कष्ट दिले. टोकाचे कष्टदायक जीवन जगल्यानंतर मध्यम मार्गच सर्वोत्तम आहे, असे त्यांना जाणवले. मन आणि बुद्धी यांच्या सम्यक उपयोगातून सिद्धार्थांना परमबोध प्राप्त होऊन ते भगवान बुद्ध बनले.
या पुस्तकाद्वारे आपण भगवान बुद्धांच्या जीवनातील पुढील रहस्ये जाणून घ्यालः
* सिद्धार्थ कधी आणि का गौतम (साधक) बनले?
* गौतमाची बोधप्राप्तीची यात्रा यशस्वी कशी झाली?
* बोधप्राप्तीनंतर भगवान बुद्धांचा प्रवास कसा झाला?
* भगवान बुद्धांनी शिष्यांना कोणते मार्गदर्शन दिले?
* भगवान बुद्धांची शिकवण कायम राहण्यासाठी सम्राट अशोकाने कोणतं महत्त्वपूर्व योगदान दिले?
प्रस्तुत पुस्तक भगवान बुद्धांच्या मुख्य तीन भूमिका दर्शवते. पहिली राजकुमार सिद्धार्थाची, दुसरी गौतमाची आणि तिसरी भगवान बुद्धांची. भगवान बुद्धांना गौतम बुद्धही संबोधले जाते. या नावांमागे असलेले रहस्यही या पुस्तकातून उलगडते.
भगवान बुद्धांची शिकवण आजच्या संदर्भात समजून देणारे हे पुस्तक अंतिम सत्याप्रत पोहोचण्यासाठी सहज साधन ठरू शकते… आवश्यकता आहे केवळ नव्या दृष्टिकोनाने वाचण्याची!
Reviews
There are no reviews yet.