वैरी मनाला मित्र कसे बनवाल
आजच्या तांत्रिक युगात अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट अशा बोलणार्या मशीनद्वारे लोक गाणी, बातम्या, एखाद्याशी फोनवर बोलणे किंवा मेसेज पाठवणे अशी कार्यं सहजतया करू शकतात. पण समजा, या उपकरणात काही बिघाड झाला आणि ते सांगितलेल्या कार्यांव्यतिरिक्त इतर काहीतरी करू लागले, चुकीच्या बातम्या सांगू लागले तर काय म्हणाल? ‘तुला जितकं सांगितलंय ना तितकंच तू कर… तुला माझ्यासाठी बनवलंय, मी तुझ्यासाठी नाहीये…’ समजलं?
मन असं बोलणारं मशीन आहे, ज्याचा रिमोट मनुष्याच्या हातात आहे, परंतु तो मनाचं ऐकण्यातच मग्न राहतो. त्यामुळे मन मनुष्याची सेवा करण्याऐवजी एखाद्या वैर्याप्रमाणे त्यालाच आपली सेवा करायला भाग पाडतं, बोटांच्या इशार्यावर नाचवतं.
मात्र प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला असे उपाय मिळणार आहेत, ज्याने तुमचं मन एक जिवलग मित्र बनून सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहील. बघू या ते उपाय…
* कोणते प्रश्न विचारल्याने मन शांत होईल?
* कोणते विचार केल्याने मन शांत राहील?
* कोणते प्रशिक्षण मिळाल्याने मन समग्र होईल?
* मनाच्या विचार चक्राची दिशा कशी बदलावी?
* मनाला आठवणीतून मुक्त कसे करावे?
* मनातील मूळ विचार (कोर थॉट) कसे ओळखाल?
* सत्य विचारांनाच प्राधान्य कसं द्याल?
* नात्यामुळे मन त्रस्त होत असेल तर काय कराल?
* मनातील भावनांकडे कसे बघाल?
* मनामुळे त्रस्त होत असाल, तर त्यातून मुक्त होण्याचा अंतिम उपाय कोणता?
Reviews
There are no reviews yet.