How to travel from मन day 2 Sun डे
मन म्हणजे दर्पण की कलकल, मन म्हणजे बालपण की परिचय पोक्तपण, मन म्हणजे मांजर की माकड, मन म्हणजे नोकर की मालक, मन म्हणजे शेळीची 'मैं… मैं…’ की वाळवंट स्वतःला सर्वांत उंच असे समजणाऱ्या उंटांचा अहंकार, मनाची अशी कितीतरी रूपे आणि वैशिष्टये आहेत. ती बघितल्यावर केवळ मन म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही तर त्याला म्हणावे लागेल The मन.
मनाच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त होऊ शकतात; त्याचप्रमाणे सत्यही प्राप्त होऊ शकते. मनाचे ज्ञान झाल्यावर पैसाही मिळू शकतो आणि प्रज्ञाही मिळते. मनाच्या श्रमाने तुरुंगही बनू शकतो आणि आश्रमही उभा राहू शकतो. आपल्या मनाच्या शक्तीने, भक्तीने, युक्तीने आणि सेवेने आपणास काय निर्माण करायचे आहे? आपल्याला सर्वोच्च, उच्चतम लक्ष्य महानिर्वाण निर्माण – MNN प्राप्त करायचे आहे का? कारण मनाचे सर्वश्रेष्ठ कार्य, मन.com 'महानिर्वाण निर्माण’ आहे.
हे पुस्तक म्हणजे मन डे पासून (Monday) सन डे (Sunday) यात्रा आहे.
मन डे पासून सप्ताहाचा आरंभ होतो, प्रत्येकाच्याच आयुष्यात मनाचे दिवस येतात. माणूस जेव्हा मनाने त्रस्त होतो तेव्हा Sun डे (प्रकाश) कडे यात्रा सुरु होते.
हे पुस्तक आपल्याला मन अकंप बनवण्यासाठी व जीवनाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी मदत करेल.
Reviews
There are no reviews yet.