प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे
तुम्ही खरंच समृद्ध आहात का? उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबा. कारण तोच मनुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध असतो, ज्याच्याकडे „संपूर्ण स्वास्थ्या’ची दौलत असते. तुमचं स्वास्थ्य आणखी उत्तम बनू शकतं, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला स्वास्थ्याच्या शिखरावर पोहोचायचंय का? जर तुमचं उत्तर „हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुमच्यासाठी „डॉक्टर’ची भूमिका निभावू शकेल.
„स्वास्थ्यासाठी विचार नियम’ हे एक असाधारण पुस्तक आहे. कारण यात समाविष्ट असलेली सूत्रं अत्यंत स्पष्ट, साधी-सोपी आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. ही सूत्रं तुम्हाला आजारांतून, वेदनेतून मुक्त होण्यासाठी नक्कीच मदत करतील. प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी „विचार नियमां’नुसार, विचारांत कोणतं परिवर्तन करायला हवं?
* आजारपण आणि वेदना यांचा मानसिक स्तरावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल?
* नकारात्मक भावनांतून मुक्त होत स्वास्थ्य कसं प्राप्त करावं?
* स्वास्थ्यासाठी „पॉवर ऑफ फोकस’ हे तंत्र कशा प्रकारे उपयोगात आणाल?
* दैनंदिन जीवनात कोणत्या „स्वास्थ्य टिप्स’ वापरायला हव्यात?
* शरीराच्या प्रत्येक अवयवाची क्षमा मागून स्वास्थ्याचं शिखर कसं गाठाल?
* स्वीकार, स्वसंवाद आणि धन्यवाद यांच्या मदतीने प्रत्येक आजारातून मुक्त कसं व्हाल?
स्वास्थ्याची दौलत प्राप्त करून खऱ्या अर्थानं समृद्ध होण्यासाठी हे औषध घ्यायला (पुस्तक वाचायला) सुरूवात करा… कमीत कमी दोन वेळा.
Reviews
There are no reviews yet.