पूर्ण संतुष्टीची भावना प्राप्त करण्याची युक्ती
बाहेरून प्राप्त करून घेता येईल,
अशी संतुष्टी ही काही प्रापंचिक गोष्ट नाही.
याउलट हा एक ईश्वरीय गुण आहे, जो सर्वांमध्ये आहे,
सतत आहे व आपल्या जीवनाचा अंश आहे.
• तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत नात्यांमध्ये संतुष्टीची जाणीव होते का?
• तुम्ही संतुष्टीने परिपूर्ण अशी झोप घेऊ शकता का?
• तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात किंवा ऑफिसमधील कामात संतुष्टी मिळते का?
• तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनामुळे संतुष्ट आहात का?
• कोणती कारणे पूर्ण संतुष्टी मिळवण्यात अडथळा आणतात?
• संतुष्ट राहण्याची कला शिकणे आवश्यक का आहे?
• कोणत्या उपायांनी ती कारणे दूर करता येतील?
• संतुष्टीची अशी कोणती व्यवस्था आहे, जी प्राप्त केल्यानंतर माणूस पुन्हा असंतुष्टीच्या दरीत कोसळत नाही?
जर तुमच्या जीवनात एखाद्या गोष्टीमुळे असंतुष्टी असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी वरदान आहे. ते तुम्हाला असंतुष्टीच्या भावनेतून मुक्त करून पूर्ण व स्थायी संतुष्टीकडे घेऊन जाईल. कारण या ग्रंथात अशा संतुष्टीविषयी सांगितलेले नाही, जी उन्हात उभ्या असलेल्या तहानलेल्याला पाणी प्यायल्याने मिळते, भुकेलेल्याला जेवण दिल्यावर मिळते किंवा खूप वर्षांनंतर भेटलेल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारून मिळते.
इथे ज्या संतुष्टीविषयी सांगितले आहे ती इंद्रियांपर्यंत, पैशांपर्यंत किंवा नातेसंबंधापर्यंत सीमित नाही. उलट त्याही पलीकडे असणारी ही परम संतुष्टी आहे. हे पुस्तक वाचण्यासाठी इतकी माहिती पुरेशी नाही का? मग घ्या हातात एक कप टी, कोणती टी? तर संतुष्टी!
Reviews
There are no reviews yet.