देव आहे हृदयात, कसा आहे, आहे तो कोण?
साधक विचारी निर्मळपणे, साधेपणाने, उत्तर ज्याचे मौन.
ज्याने ध्येयपूर्तीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले अशा महापुरुषाचे जीवनचरित्र तुम्हाला वाचायला आवडेल का? आणि ध्येयसुद्धा असे की ज्याच्या यशाचा परिणाम शेकडो वर्षांनंतरही समाजात बघायला मिळतो. हा महापुरुष आहे समर्थ रामदास! या महान तपस्व्याने सतराव्या शतकात समाजात धर्मरक्षेची व राष्ट्रभावनेची ज्योत प्रज्वलित केली. प्रज्ञा व प्रभावशाली वाणी यांच्या जोरावर त्यांनी समाजात संघटित शक्ती निर्माण केली. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची जीवनगाथा प्रस्तुत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
एखाद्या संताचे किंवा महापुरुषाचे जीवनचरित्र त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याशिवाय अपूर्ण आहे. संतांनी दिलेली शिकवण कालातीत असते. वर्षानुवर्षे ती आपल्याला मार्गदर्शन करते. समर्थ रामदासांनी रचलेले सर्व महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘मनाचे श्लोक’ व ‘दासबोध’ महाराष्ट्रात खूप प्रचलित आहेत. या महान रचनांमधील तत्त्वांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी यांतील निवडक भाग हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.
या रचना आपल्या जीवनात आंतरीक व व्यावहारिक उन्नतीसाठी यशस्वी ठरतील.
Reviews
There are no reviews yet.