तणावाला बनवा, आपली ताकद
कामाचा ताण…
करिअरची काळजी …
कौटुंबिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना..
अजिबात घाबरू नका, हे पुस्तक तुमच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे.
तणाव म्हणजे एक प्रकारचं ओझंच! जे आपण सतत वाहत असतो. सुरुवातीला छोटे-छोटे तणाव आपण सहजतेने सहन करतो, पण कालांतराने त्याचा भार वाढत गेल्याने त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसू लागतो, पण आता याच भाराच्या साहाय्याने आपली क्षमता वाढवायची आहे.
तुम्ही वेटलिफ्टर पाहिला असेल. तो कमी वजन उचलून त्याच्या करिअरची सुरुवात करतो. मग जसजसा वजन वाढवत जातो, तसतशी त्याची ताकद वाढत जाते. त्याचप्रमाणे आपल्याला आपली मानसिक शक्ती वाढवायची आहे, जेणेकरून कोणताही मोठा ताण आला तरी शांतपणे तो सहन करून पुढे जायचं आहे.
यासाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेल्या महत्त्वाच्या तंत्रांचा वापर तुम्हाला करावा लागेल. याच्या मदतीने तुमच्या आयुष्यातील तणाव सहजपणे दूर करून, त्यांना बाय-बाय म्हणू शकता.
जीवनात कोणताही ताण येणार नाही असं नाही, पण यानंतर जेव्हा कधी तणाव येईल तेव्हा तुम्ही शांत आणि स्थिर राहू शकाल. तणावाला तुमची ताकद बनवून ज्याने तुम्हालाही आश्चर्य वाटेल, असं काहीतरी कराल. चला तर मग याची सुरुवात आजपासून… नव्हे आतापासूनच करू या!
Reviews
There are no reviews yet.