विश्वाचं अपरिवर्तित सत्य
'परिवर्तन’ जीवनाचा न बदलणारा, अटळ असा नियम आहे. जणू निसर्गाकडून मिळालेलं वरदानच! विश्वात परिवर्तन आवश्यकच आहे. कारण बदल घडल्यानेच नवनिर्मिती होते, विकास होतो.
खरंतर परिवर्तन घडत असतं ते जीवनाचं संतुलन कायम राखण्यासाठीच. जेणेकरून जुन्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जाऊन त्या जागी नूतन, विकसित रूप उदयाला यावं. मनुष्याने या परिवर्तनाला वरदान समजलं तर त्याच्या जीवनात निरंतर विकास होत राहील. जसं, लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यासाठी नवीन वस्त्रं, पादत्राणं आणली जातात, तसंच मनुष्याच्या जीवनात बदल घडल्याने त्याच्यात अनेक गुण विकसित होतात.
मात्र मनुष्य परिवर्तनाला अभिशाप बनवतो. ज्यायोगे तो संकुचित विचारसरणीमुळे परिवर्तनाचा केवळ एकच पैलू पाहू शकतो. त्यात दडलेला स्वतःचा विकास पाहू शकत नाही. थोड्याशा सुखसुविधांच्या मोहापायी मनुष्य परिवर्तनाचा अस्वीकार करून प्रगतीची सुवर्णसंधी व्यर्थ दवडतो.
परिवर्तनापासून पलायन करण्याच्या वृत्तीतून मुक्त होण्याचं कौशल्य प्रस्तुत पुस्तकात जाणूया… शापाला वरदानात बदलू या. याखेरीज आपण जाणणार आहोत –
* परिवर्तनात दडलेले संकेत कसे पाहावेत?
* अनुमती देऊन संपूर्ण सफलता कशी प्राप्त करावी?
* अनुकूलनशील कसं आणि का बनावं?
* परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी कोणता मंत्र लक्षात ठेवावा?
* आंतरिक विरोध कसा समाप्त करावा?
* विश्वाचं अपरिवर्तित सत्य काय आहे?
Reviews
There are no reviews yet.