आंतरिक क्षमतेचा दिवा प्रज्वलित करा
प्रस्तुत पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं केवळ जीवन चरित्र नाही. तर यात अशा एका मनुष्याचं चित्रण आहे, ज्यानं स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा शोध घेतला आणि त्या प्रकाशात आणल्या. प्रस्तुत पुस्तकात एडिसन यांना सफल बनवणाऱ्या कारणांवरच केवळ भर देण्यात आलेला नसून त्यांच्या जीवनातील अनेक घटनांच्या माध्यमातून, त्यांच्या चारित्र्याची वैशिष्ट्यंही शब्दबद्ध करण्यात आली आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बोलू न शकणारा मुलगा पुढे औद्योगिक क्रांतीचा मार्गदर्शक कसा बनला? यामागील अदृश्य नियम प्रस्तुत पुस्तकात समजून सांगण्यात आले आहेत.
* अपयशाच्या अंधारात यशाचा शोध कसा घ्याल
* संधी शोधण्यासाठी दृष्टिकोनाचं महत्त्व
* सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महान कार्य करण्याचं धाडस
* केवळ स्वतःचा विचार न करता „अव्यक्तिगत दृष्टिकोन’ बाळगण्याचं महत्त्व
* अशक्य वाटणारं कार्य „सहजशक्य’ करण्याची हातोटी
* हजारवेळा अपयश आल्यानंतरही न डगमगता कार्यरत राहण्याचं रहस्य
* प्रत्येक घटनेत वेगळा विचार करण्याची कला
* स्वतःमधील अगणित शक्यता आणि अमर्याद ऊर्जा यांची ओळख
Reviews
There are no reviews yet.