भक्तिभाव, बोध व आनंद यांचा अद्भुत संगम
ईश्वराला प्रसन्न करण्याचा, ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा मार्ग खूप कठीण आहे असे जेव्हा-जेव्हा धर्माच्या ठेकेदारांनी समाजात भ्रम पसरवला, तेव्हा-तेव्हा खुद्द ईश्वराने असे परिसासमान भक्त पृथ्वीवर पाठवले व त्यांनी त्यातील खोटेपणा सिद्ध केला. त्याचबरोबर सामान्य लोकांना भक्तीचा सहज व सोपा मार्ग दाखवला व स्वतःच्या सान्निध्याने त्यांना सोन्याप्रमाणे शुद्ध व निर्मळ भक्त बनवले.
त्यांनी संदेश दिला, “हसत-नाचत-गात, आनंदाने जीवन जगत, दैनंदिन कार्य करता-करता फक्त हरीचे नामस्मरण करत ईश्वरप्राप्ती होऊ शकते. त्यासाठी धर्माच्या किंवा ईश्वराच्या नावाखाली कोणत्याही फंदात पडण्याची अथवा कर्मकांडात गुरफटण्याची अजिबात गरज नाही. प्रेमाने ईश्वराचे नामस्मरण करताच तो तुमचा होईल.”
चैतन्य महाप्रभू सखी भाव धारण करणारे असेच एक महान वैष्णव भक्त होते. त्यांनी मोठ-मोठी वेद-वाक्ये, अनुष्ठाने इत्यादींचे एका सरळ व साध्या मंत्रात परिवर्तन केले. त्यांचा मार्ग आजही लाखो-करोडो भक्त अनुसरत आहेत व आनंदाने भक्तीची अभिव्यक्ती करत आहेत.
या ग्रंथाद्वारे आपण चैतन्य महाप्रभूंच्या या आनंदलीलेचे साक्षी बनून, भक्तीच्या विभिन्न अवस्था समजून घेणार आहात. त्यांच्या परिसासमान असलेल्या प्रभावामुळे आपण सोन्यासारखे भक्त होऊन भक्ती व आनंदाच्या वर्षावात चिंब भिजावे अशी शुभकामना देऊन हा ग्रंथ आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.
Reviews
There are no reviews yet.