इच्छामुक्तीचा मूलमंत्र
प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगात एक मूळ इच्छा असते ती म्हणजे स्वतःला जाणण्याची, स्वानुभवाच्या सागरात स्वतःला विलिन करण्याची आणि ‘स्व’त्वाच्या अनुभूतीत स्थापित होण्याची. वास्तवात मानव असीम अस्तित्वाशी एका महान, उदात्त हेतूने जोडला गेलाय. म्हणूनच त्याच्या मनात सत्यात स्थापित होण्याची मूळ इच्छा सुप्तावस्थेत असते. पण अज्ञान, अहंकार, विकार, कुसंस्कार, दुराचार आणि बेहोशीमुळे त्याची ही मूळ इच्छा अनेक अनावश्यक आकांक्षांमुळे झाकोळली जाते. कारण त्याच्या या व्यर्थ इच्छांना ना कोणता मूलाधार असतो, ना कोणता दिव्य उद्देश.
आजच्या तंत्रप्रगत युगात अनावश्यक इच्छांच्या जाळ्यात अडकल्याने मनुष्याची जीवनरूपी नौका भवसागरात भरकटतेय. मोहमाया आणि चुकीच्या धारणांना बळी पडून त्याच्या जीवनाची गुणवत्ता तर ढासळली आहेच, पण त्याला स्वतःच्या अमर्याद क्षमतांचं विस्मरण झालंय.
प्रस्तुत पुस्तक म्हणजे अशा सर्व अनावश्यक इच्छा समाप्त करून शुभ इच्छेची ज्योत जागृत करणारा जणू ऊर्जास्त्रोतच! चिमणी एक-एक काडी गोळा करत स्वतःचं घरटं बांधते, तसंच आपल्यालाही शरीररूपी घरट्यातील एक-एक स्थूल आणि सूक्ष्म इच्छेचा शोध घेऊन त्या विलिन करायच्या आहेत. कारण हे केवळ आपलं घरटं नसून ते ईश्वराच्या निवास आणि अभिव्यक्तीचं पवित्र मंदिर आहे. हे केवळ पुस्तक नसून इच्छामुक्तीचा मूलमंत्र आहे, जो तुमच्या अंतर्यामी सत्य, प्रेम, आनंद आणि आत्मसमृद्धीची जाणीव वृद्धींगत करेल, तुमच्या अंतर्मनाचं प्रोग्रामिंग करेल.
Reviews
There are no reviews yet.