आपल्या श्रद्धेची शक्ती कुठे समर्पित कराल
प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगात श्रद्धा असतेच. तसंच सर्वांचा कोणीतरी आदर्शही असतोच. मग तो कोणी राजनेता, देव-देवता, अभिनेता अथवा संत-महात्मादेखील असू शकतो. त्यानंतर मनुष्य, आयुष्यात काय करावं-कसं वागावं, कोणते निर्णय घ्यावेत? याचं अनुकरण आपला आदर्श समोर ठेवून करतो.
मात्र त्याची श्रद्धा कशात आहे, कुणावर आहे? त्याचप्रमाणे भविष्यात आपली अवस्था असेल. आपलं भविष्यही याच गोष्टीवर अवलंबून असेल. प्रस्तुत ग्रंथात यावरच मार्गदर्शन दिलंय.
* दैवी आणि असुरी गुण म्हणजे काय?
* असुरी गुणांची गती कशी असते?
* शास्त्रानुकूल कर्मं कशी जाणावीत?
* श्रद्धा किती प्रकारच्या असतात?
* पूजा, आहार, तप, दान आणि यज्ञ यांमागे कोणती भावना असायला हवी?
* शरीर, वाणी आणि मन यांविषयी कोणते तप आहेत?
चला तर, प्रस्तुत ग्रंथाद्वारे आपला योग्य आदर्श ओळखा. आपल्या अंतर्यामी दैवी गुणांचा संचार करून सात्त्विक श्रद्धा जागृत करा.
Reviews
There are no reviews yet.