जीवनाला नवे वळण देणारी कथा
मनुष्य चुकीचा असतो की त्याच्यातील वृत्ती चुकीच्या असतात, की बाह्य परिस्थिती चुकीची असते? हा मनन करण्यायोग्य प्रश्न आहे.
बर्याचदा लोक इतरांविषयी मत बनवताना दिसतात. खरंतर ते मनुष्याच्या वृत्ती पाहूनच आपलं ठाम मत बनवत असतात. प्रत्येक मनुष्य बदलत आहे, पण लोकांची मतं मात्र बदलत नाहीत. जोवर मनुष्याचं खरं चारित्र्य सर्वांसमोर आणणारी एखादी घटना घडत नाही, तोवर त्या मनुष्याविषयीची मतं बदलत नाहीत.
या कथेचा नायक ‘आनंद’ हासुद्धा अशाच समस्यांनी घेरला गेलाय. त्याचं वर्तमान त्याच्या भूतकाळाने झाकोळलं गेलंय. आपल्या गतकाळाला मागे सारत तो जीवनाचा नवा अर्थ शोधण्यासाठी निघतो.
* आनंद जीवनाचा अर्थ शोधू शकतो का?
* गतकाळात घडलेल्या चुकांमधून तो मुक्त होतो का?
* त्याच्या जीवनात कोणी नवा प्रकाश घेऊन येतं का?
* त्याचं भविष्य खरोखरच बदलतं का?
* अशांतीतून मुक्त होऊन, तो शांतीदूत कसा बनतो?
या सर्व प्रश्नांची रोमांचक पण खरी उत्तरं आता आपल्याच हातात आहेत.
Reviews
There are no reviews yet.