आध्यात्मिक उपनिषद
मुक्त अवस्था प्रकट करण्याचं रहस्य
सत्यरूपी एक वाक्यही आपल्या अंतरंगातील कबीरत्व प्रकट करू शकतं… द्रोणाचार्यांची एक मूर्तीही एकलव्यातील तेजाची निर्मिती करू शकते… तसंच एक मनन संकेतसुद्धा आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकतो… केवळ आपल्यात ग्रहणशीलता आणि मननाद्वारे मोती वेचण्याची कला असायला हवी. आपल्याला जर ही कला साधली नसेल, तर असीम ज्ञानही छिद्र असलेल्या बादलीत भरलेल्या पाण्याप्रमाणे वाहून जाईल.
मनुष्य जेव्हा आपल्या चुकांबाबत मनन करून त्यातून बोध प्राप्त करतो, आपल्या कुप्रवृत्तीबाबत मनन करून, ते नष्ट करण्यासाठी कार्यरत राहतो, तेव्हाच तो त्यातून मुक्त होऊ शकतो. अनायासपणे क्रिया सुरू होऊन मुक्तीची अवस्था प्रकट व्हावी आणि प्रत्येक रहस्याचा उलगडा व्हावा, इतकं आपलं मनन सखोल असायला हवं.
हेच उद्दिष्ट सहज सोपं करण्यासाठी प्रस्तुत पुस्तकात काही निवडक प्रेरक कथांसह काही प्रश्नांचंही संकलन केलं आहे. त्यांचं पठण करत असताना आपल्याला मननाद्वारे मोती वेचण्याची कला तर प्राप्त होईलच, शिवाय तसं जीवन जगण्याची प्रेरणाही निश्चितच मिळेल. जसं –
* इतरांना मौलिक साहाय्य कसं कराल
* असत्य आणि खलप्रवृत्तीपासून स्वतःला कसं वाचवाल
* अधोगतीचं (पतन) मूळ कारण काय आहे
* अडचणींनाच आव्हान कसं बनवाल
* कमकुवतपणाचं शक्तीत रूपांतर कसं कराल
* जीवनात गुरूंची आवश्यकता का असते
Reviews
There are no reviews yet.