तुम्ही कोणता निर्णय घ्याल?
‘निर्णय घेणं’ हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठताच मनुष्य निर्णय घ्यायला सुरुवात करतो. जसं, उठून अलार्म बंद करायचा, की आणखी पाच मिनिटं झोपायचं? लाल शर्ट परिधान करायचा, की निळा जास्त चांगला दिसेल? समोरून येणार्या व्यक्तीला ओळख द्यायची की नाही? हाती घेतलेलं काम आताच पूर्ण करावं, की उद्यावर सोडावं? खोटं बोलू की क्रोध करू… अशा प्रकारे आपल्यासमोर जर एक सोपा आणि दुसरा योग्य असे दोन पर्याय असतील, तर अशा वेळी आपण काय कराल? सोपा पर्याय निवडणं योग्य, की योग्य पर्याय निवडणं श्रेयस्कर ठरेल?
मनुष्याच्या अगदी छोट्याशा निर्णयातदेखील जीवनाची दिशा बदलण्याचं सामर्थ्य आहे. एखाद्या निर्णयाने मनुष्याचं जीवन सावरलंही जाऊ शकतं, तसंच ते दिशाहीनही होऊ शकतं, हाच संकेत प्रस्तुत पुस्तकातून मिळतो. या पुस्तकातील पात्रांच्या जीवनाला कोणती दिशा द्यायची, हे वाचकांच्या हातात आहे. अर्थात, आपणच आहात या पात्रांच्या जीवनाचे चित्रकार! कारण त्यांच्या जीवनात घडणार्या घटनांना, त्यांच्या भविष्याला कोणता आकार द्यायचा, हे सर्वस्वी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. हेच आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य! आता तुमच्या निर्णयावरच या पुस्तकातील पात्रांचं यश अवलंबून आहे.
मग आता तुम्ही कोणता निर्णय घ्याल?
Reviews
There are no reviews yet.