‘आता मला चक्रव्यूहातून म्हणजेच मायेच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे…,’ असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? बालपणापासून आजपर्यंत तुम्ही ज्या धारणांमध्ये जगत आला आहात, त्याच तुमच्या मुलांनादेखील मिळायला हव्यात का? मायेच्या आधीन न होता तिच्यावर मात कशी करता येईल? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवेत.
कारण अध्यात्मातदेखील लोक अनेक प्रश्नांची जुनी उत्तरंच प्रमाण मानून बसले आहेत. जसं,
* गतजन्मातील कर्मांचं फळ आज मिळेल, तर या जीवनातील कर्मांचं फळ पुढच्या जन्मी.
* आजची कर्मं आत्ता कोणताही आनंद देणार नाहीत, पुढच्या जन्मातच याचा लाभ होईल.
* नशिबात असेल तरच आम्हाला आनंद मिळेल. (खरंतर, आनंद हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.)
* ईश्वर – विशेष चेहरा, आभूषण अथवा विशिष्ट पेहराव परिधान करतो. तो काही बाबतीत नाराज होतो, तर कधी खुश होतो.
* मोक्ष- मृत्यूनंतरच प्राप्त होतो.
वरील धारणा प्रमाण मानणारे लोक जुनं ज्ञानही आचरणात आणत नाहीत आणि नवीन ऐकायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था त्रिशंकूप्रमाणे होते. म्हणून ते अपूर्ण ज्ञानाच्या आधारेच जीवन व्यतीत करतात. परंतु आता वेळ आली आहे, योग्य उत्तरं मिळवून अस्सल अध्यात्म, जीवनाचं ध्येय जाणून घेण्याची!
आध्यात्मिक ज्ञानाचा चुकीचा अर्थ लावल्याने मनुष्य त्याच्या जीवनातील दुःख, निराशा आणि अपयश यांचं कारण प्रारब्धात शोधत राहतो. याबाबत तो ज्यांना विचारतो, त्यांनादेखील याची पुरेशी जाण नसते. परंतु असे अज्ञानी लोक अहंकारवश ‘मला माहीत नाही’ हे प्रांजळपणे सांगण्याऐवजी देवी-देवता, कर्म-भाग्य, जीवन-मृत्यू आणि पूर्वजन्म याविषयी कथा सांगून लोकांना भुलवतात.
अशा लोकांनी चुकीची उत्तरं देऊन मनुष्याची विचारशक्तीच नष्ट केली आहे. मात्र आता वेळ आली आहे, प्रस्तुत पुस्तकाचं उद्दिष्ट साध्य करण्याची, आपल्या जीवनातील केवळ 24 तास खर्च करून सत्य जाणण्याची!
Reviews
There are no reviews yet.