‘मला वेळच नाही,’ यावर उपाय
आयुष्यातला एक दिवस खर्च करून तुम्हाला नक्की काय मिळतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय? अशा अनेक प्रश्नांवर आपण मनन न केल्याने ‘मला वेळच नाही,’ ही सबब पुढे करतो. यांसारख्याच काही प्रश्नांची उकल आपल्यासमोर केलीय या पुस्तकाद्वारे!
वेळेचं नियोजन करण्याची प्रभावशाली, प्रॅक्टिकल आणि उपयुक्त टेक्निक्स या पुस्तकातील वेळापत्रकात निश्चितच मिळतील. यापूर्वीही तुम्ही वेळेचं नियोजन करण्याची काही तंत्र ऐकली असतील. परंतु त्या सर्व टेक्निक्सचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करायचा, हे शिकवणं हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. प्रस्तुत पुस्तकातील काही महत्त्वपूर्ण बाबींवर एक दृष्टिक्षेप टाकूया-
* प्राथमिकता, वेळेची मर्यादा आणि 80/20 च्या नियमाद्वारे वेळेचं नियोजन करण्याची पद्धत
* वेळेची समृद्धी प्राप्त करण्याचं तंत्र
* इतरांवर कार्य सोपवून वेळेची बचत कशी करावी
* ‘टाइम किलर्स’ला किल करण्याची योग्य पद्धत
* कार्यांच्या मानसिक ओझ्यातून मुक्त होण्याची पद्धत
* ‘नकार’ देऊन वेळ वाचवण्याची पद्धत
* ऊर्जा वृद्धिंगत करून वेळेची बचत करण्याचं तंत्र
* कमी वेळेत कार्य पूर्ण करण्याची कला
या बाबींवरील ज्ञान प्राप्त करून, वेळेचं गणित जमवायला शिकूया. कारण वेळ सांभाळला, तर सर्व काही आपोआपच सावरलं जाईल.
Reviews
There are no reviews yet.