7 बहुमूल्य प्रश्नांची किमया
एका शूरवीर योद्ध्याला अत्यंत कठीण असे सात प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला कधी घनदाट अरण्यात प्रवास करावा लागला;
तर कधी तप्त वाळवंटात पायपीट करावी लागली. कधी पर्वतांवर, डोंगरटेकड्यांवर चढावं लागलं; तर कधी अंधाऱ्या गुहेत ठेचकाळत शोध घ्यावा लागला. अखेरीस त्याला सात कठीण प्रश्नांची उत्तरं गवसली. कारण त्याच्याजवळ होती दोन शस्त्रं, ‘साहस’ आणि ‘योग्य समज’. त्या योद्ध्याचं नाव, ‘हातिम’.
वाचकहो, तुम्हालाही हातिमप्रमाणे शोधमोहीम हाती घ्यायची आहे. पण हे शोधकार्य तुम्हाला कोठे बाहेर करायचं नसून, ते तुमच्याच अंतर्यामी करायचं आहे. हातिमचा प्रवास तर अत्यंत खडतर होता; पण तुमची अंतर्यात्रा मात्र सुखद आणि सहज असणार आहे. कारण प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जीवनरूपी प्रवासातील समस्यांचा, आव्हानांचा सामना करण्यासाठी एकूण चौदा सूत्रं लाभणार आहेत.
या कथारूपातील पुस्तकाद्वारे जाणा-
* अशक्य कार्य शक्य कसं करावं?
* यशप्राप्तीसाठी निसर्गाशी ताळमेळ कसा साधावा?
* दुःखातून मुक्त होण्याचं नेमकं रहस्य काय?
* निःस्वार्थ जीवन जगल्यानं नेमकं काय प्राप्त होतं?
* कर्मविज्ञान म्हणजे काय, कर्मबंधनांतून मुक्ती कशी मिळेल?
* प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि मधुर नातेसंबंध यांनी परिपूर्ण आयुष्य कसं जगावं?
* जन्म-मृत्यूचं रहस्य काय?
Reviews
There are no reviews yet.