अलौकिक बाळाच्या आगमनासाठी काय कराल?
तुमच्या घरी येणारा छोटा पाहुणा या जगात का येत आहे?
तो तुमच्याच घरी का जन्म घेत आहे?
तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे?
आपल्या बाळात आनंद, धैर्य, प्रेम, विश्वास हे गुण रुजवण्यासाठी काय करावं लागेल?
आपल्या बाळाच्या बौद्धिक, आध्यात्मिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्त्रीने कोणता बोध अंगीकारून स्वतःमध्ये परिवर्तन घडवावं?
प्रसूतीबाबत मनात असलेली भीती, शंका कशा दूर कराव्या?
गर्भसंस्कारांशी संबंधित असे अनेक प्रश्न माता-पिता होऊ इच्छिणार्या लोकांच्या मनात उद्भवत असतात? खरंतर किती जण त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात? यासंबंधात इंटरनेटवर किंवा पुस्तकांमध्ये प्रचंड माहिती उपलब्ध आहे. परंतु या अति माहितीच्या गदारोळात अनेक लोक संभ्रमित होतात. नेमकं काय करावं… काय करू नये…! हे त्यांना समजत नाही.
अशा वेळी, ‘गर्भधारणेपूर्वी, स्त्रीने, तिच्या संपूर्ण कुटुंबासह, स्वतःमध्ये असे संस्कार बिंबवले पाहिजेत, जेणेकरून गर्भधारणेनंतर, एक निरोगी, सुंदर, तेजस्वी आणि अलौकिक मूल आपोआप विकसित होऊ शकेल.’ हा बोध अंगीकारायला हवा.
थोडक्यात, तुम्हाला ज्या प्रकारचं मूल हवं आहे, त्यानुसार स्वतःला तयार करायला लागेल. ज्यायोगे तुमचंच प्रतिबिंब बाळामध्ये दिसून येईल.
यासाठी कशी तयारी करावी, याबाबत हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. माता-पित्यांच्या, कुटुंबाच्या आणि होणार्या बाळाच्या परिवर्तनासाठी हे उपयुक्त ठरेल. यामध्ये थेट, अचूक आणि संक्षिप्त प्रश्नोत्तरांद्वारे मार्गदर्शन केलं गेलेलं आहे.
चला तर मग, आधुनिक ज्ञान मिळवा, सुदृढ आणि अलौकिक पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज व्हा…!



Reviews
There are no reviews yet.