आयुष्यावर आश्चर्यकारक परिणाम करणारी काही छोटी कर्मं
अगदी किरकोळ वाटणारी ही करुणामय पावलं तुमची दिनचर्या आणि दृष्टिकोन या दोन्हीमध्ये आश्चर्यकारक बदल घडवतील. या पुस्तकात सहानुभूतीच्या कलेपासून, ते कठोर लोकांविषयी मनात करुणाभाव जागृत करण्यापर्यंत, सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘स्वतःवर दया करणंही का आवश्यक आहे?’ मग तीच करुणा कशा प्रकारे संपूर्ण जगतात पोहोचते, याचं स्मरण हे पुस्तक करून देते.
या पुस्तकातील मुख्य मार्गदर्शन :
दया दाखवणे आणि उपकार करणे यातील सूक्ष्म फरक
परोपकाराची शक्ती आणि दयेचा अद्भुत प्रभाव
गरिबी, कमतरतेची भावना आणि गिफ्ट सिक्रेट
21 दिवसांचे आव्हान आणि आयुष्यभरासाठी हलकेपणा
मानवता, करुणा आणि सर्वोच्च ध्येयाशी ताळमेळ
वरील मुद्दे सखोलपणे समजून घेतल्यास तुम्हाला आतून हलकेपणा तर जाणवेलच, शिवाय तुम्ही अधिक उदार आणि मानवतावादी बनाल.
स्वतःसह, इतरांमध्येही प्रेम, करुणा आणि आनंदाचे बीज पेरण्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलंय. ‘दया करणे ही केवळ एक सवय न राहता ती तुमची खरी ओळख, तुमचा संस्कार आणि स्वभाव बनावा’, हाच आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश!!



Reviews
There are no reviews yet.