लीडरशिपच्या विकासात प्रभावशाली नवं पाऊल -लीडरगम हनुमान
पवनपुत्र हनुमानांना नेहमी त्यांच्या गुणाद्वारे जाणलं जातं. कोणी त्यांना रामभक्त म्हणतं तर कोणी महाबली हनुमान! मात्र प्रस्तुत पुस्तकात त्यांना आणखी एका नवीन नावाने संबोधलंय, ते म्हणजे लीडरगम हनुमान!
लीडरगमचा अर्थ आहे, असं कुशल नेतृत्व, जे सर्व लीडर्सना योग्य मार्ग दाखवतो. एकीकडे श्रीराम, राजा सुग्रीव तर दुसरीकडे लक्ष्मणांसारखे वीर, बिभीषण आणि नल-नील ङ्मांसारखे हुशार महान लीडर्स… तरीही या सर्व लीडर्सना सोबत घेऊन ‘लीडरगम हनुमानाने’ सगळ्यांना लक्ष्याशी जोडून ठेवलं.
विश्वाला आज अशा लीडर्सची आवश्यकता आहे, जे अंत:प्रेरणेने मार्गदर्शित होऊन कार्य करतात. हनुमानांनी सदैव आपल्या हृदयात स्थित श्रीरामांकडूनच मार्गदर्शन घेतलं. त्यामुळेच ते खरे लीडर बनले.
हनुमानांसारखे नायक, आपल्या पदाने नव्हे तर सद्गुणरूपी शक्ती, प्रामाणिकपणा, मधुर वाणी आणि इतरांचा निरंतर विकास… या प्रबळ इच्छेने, लोकांना प्रभावित करतात… शिवाय हनुमान केवळ बाहुबलीच नव्हते तर ते आत्मबली, मनोबली आणि बुद्धिबलीदेखील होते.
चला तर, आपणदेखील त्यांचे हे सर्व गुण आत्मसात करू या…
Reviews
There are no reviews yet.