सुस्तीपासून मुक्ती मिळवण्यात कधीच सुस्ती करू नका…
माणसाच्या शरीरासाठी तमोगुण काही प्रमाणात आवश्यक आहेच, पण याचा अतिरेक मात्र त्याच्या अभिव्यक्तीसाठी अडथळा बनतो. आळस हा असा विकार आहे, जो माणसाच्या सर्व सद्गुणांना झाकोळून टाकतो. या विकाराच्या प्रभावात आल्यामुळं एक सर्वोत्तम कलाकार, रचनाकार किंवा कुठलीही यशस्वी व्यक्ती आयुष्यभर अपयशालाच बळी पडते.
हे पुस्तक आहे तुमच्या अंतर्यामी दडलेल्या सर्वांत मोठ्या शत्रूविरुद्ध तुम्हाला चेतवण्यासाठी. या शत्रूला वेळीच ओळखून अंतर्यामी शोध घ्या आणि त्यातून मुक्त व्हा. या उच्च कार्यासाठी प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला मिळतील – 7 संकेत, 7 पावलं, 7 दिशा आणि 13 उपाय.
प्रस्तुत पुस्तक “हत्यार’ आहे आळसरूपी शत्रूला कायमचं दूर पळवण्यासाठी. चला तर मग, सुस्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुस्ती न करता या पुस्तकाचा लाभ घेऊया…
सुस्तीवर करूया मात, मग बघा कशी होईल उत्साही जीवनाची सुरुवात…
Reviews
There are no reviews yet.